आमच्याबद्दल
सामर्थ्य मायमराठीचे । विकसन मायबोलीचे ॥
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर ही माय मराठीच्या विकासाला वाहिलेली महाराष्ट्रातील एक अग्रगण्य उपक्रमशील संस्था आहे. “सामर्थ्य माय मराठीचे / विकसन मायबोलीचे” या ब्रीदवाक्याने संघाची स्थापना २००८ साली झाली.
मराठी भाषा साहित्य, संस्कृती, संवर्धन, संशोधन आणि सर्जनशील लेखन यासंदर्भात ‘शिविम’ ने विद्यार्थी, शिक्षक व समाजकेन्द्री विविध उपक्रमाने ठसा उमटविला आहे. अकरा राष्ट्रीय चर्चासत्रे, अधिवेशने, युजीसी मान्यताप्राप्त विद्वत्प्रमाणीत ‘शिविम संशोधन पत्रिकेचे’ प्रकाशन, गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सामाजिक बांधिलकी असे विविध उपक्रम सातत्याने राबवले आहेत; त्यासाठी अनेक दानशूर हात पुढे येत आहेत.
सभासदांच्या योगदानाने ‘शिविम’ विकासाभिमुख होत आहे. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
आमची उद्दिष्टे
- मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचे संवर्धन करणे.
- अध्यापन, संशोधन आणि सर्जनशील लेखनाला प्रोत्साहन देणे.
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, अधिवेशने व कार्यशाळांचे आयोजन करणे.
- बदलत्या अभ्यासक्रमांसाठी (NEP-2020) शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेणे.
- विद्यार्थ्यांसाठी निबंध व कथा लेखन स्पर्धा आयोजित करणे.
- गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा गौरव आणि सामाजिक बांधिलकी जपणे.
संघाची ठळक वैशिष्ट्ये
स्थापना २००८
१ मे २००८ रोजी स्थापन झालेली मराठी प्राध्यापकांची उपक्रमशील संघटना.
राष्ट्रीय चर्चासत्रे व अधिवेशने
आजपर्यंत पंधरा वार्षिक अधिवेशने आणि अनेक राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे.
शिविम संशोधन पत्रिका
ISSN 2319-6025 विद्वत्प्रमाणित, यु.जी.सी. मान्यताप्राप्त त्रैमासिक.
शिक्षक प्रशिक्षण
NEP-2020 नुसार बदललेल्या अभ्यासक्रमांवर कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरे.
लेखन स्पर्धा
विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध व कथा लेखन स्पर्धा.
सामाजिक बांधिलकी
गरजू साहित्यिक व विद्यार्थ्यांना मदत, गुणवंतांचा गौरव.