शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या वतीने उत्तम बंडू तुपे यांना मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ (शिविम) यांच्यातर्फे मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांना त्यांच्या औषधोपचारासाठी एक लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी शिविमचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ. हणमंत पोळ उपस्थित होते.
प्राध्यापकांची सामाजिक बांधिलकी जपत, गरजू साहित्यिक, विद्यार्थी व समाजघटकांच्या पाठीशी उभे राहणे हे शिविमचे महत्त्वाचे कार्य आहे.

