कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करार अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि कथा लेखन स्पर्धा आयोजित केली जाते.
दरवर्षी प्राचार्य स्व. संभाजीराव देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आणि कथा लेखन स्पर्धा आयोजित केली जाते. प्राचार्य स्व. संभाजीराव देसाई हे मराठीचे व्यासंगी प्राध्यापक, कुशल प्रशासक, साक्षेपी संपादक, शिविमचे सक्रीय कार्यकर्ते आणि संवेदनशील माणूस होते.
निबंध लेखन स्पर्धेचे विषय
- कोरोना आणि मानवी जीवन
- साहित्यिक यशवंतराव चव्हाण
- ई माध्यम आणि मराठीचे बदलते स्वरूप
- कृषी कायदे व शेतकरी आंदोलन
- ऑनलाईन शिक्षण : सर्वांगीण शिक्षण होऊ शकेल काय?
कथा लेखन स्पर्धा
कथा लेखनास विषयाचे बंधन नाही.
पारितोषिक योजना
- प्रथम क्रमांक – १५००/- रुपयांचे ग्रंथ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, कला व वाणिज्य महाविद्यालयाकडून ५०० रु.
- द्वितीय क्रमांक – १०००/- रुपयांचे ग्रंथ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, कला व वाणिज्य महाविद्यालयाकडून ५०० रु.
- तृतीय क्रमांक – ७५०/- रुपयांचे ग्रंथ, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, कला व वाणिज्य महाविद्यालयाकडून ५०० रु.
* नियमावली *
- स्पर्धेत कोणत्याही विद्याशाखेचे आणि विषयाचे पदवीस्तरावरील विद्यार्थी भाग घेऊ शकतात.
- निबंध किंवा कथा स्वलिखित आणि अप्रकाशित असावी. तसे प्रतिज्ञापत्र सोबत जोडावे.
- निबंध २००० शब्दमर्यादेपर्यंत असावा, कथा लेखनास शब्दमर्यादेचे बंधन नाही.
- वाङ्मयचौर्य हा कायद्याने गुन्हा आहे. याची गंभीर दखल कथालेखन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावी. याबाबत काही कायदेशीर समस्या निर्माण झाल्यास संबंधित विद्यार्थी आणि महाविद्यालय जबाबदार राहील.
- निबंध किंवा कथा कागदाच्या एकाच बाजूस, पुरेसा समास सोडून सुवाच्य हस्ताक्षरात लिहावा.
- निबंध किंवा कथेवर विद्यार्थ्याने स्वतःचे नाव लिहू नये किंवा महाविद्यालयाचा शिक्का उमटवू नये. एका स्वतंत्र कागदावर स्वतःचे नाव, वर्ग, महाविद्यालयाचे नाव, पत्ता, फोन नंबर लिहावा.
- महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून आलेल्या निबंधांची गुणानुक्रमे निवड करून एका विषयावर एकच निबंध पाठवावा. म्हणजे पाच विषयांवर पाच निबंध स्पर्धेला पाठवता येतील. हे बंधन कथालेखन स्पर्धेसाठी नाही.
- निबंध किंवा कथेची छायांकित प्रत स्वतःजवळ ठेवावी. परीक्षणानंतर लेखन परत पाठविले जाणार नाही.
- स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.
- परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असेल.

