info@shivim.com सामर्थ्य मायमराठीचे । विकसन मायबोलीचे ॥

आमच्याबद्दल

सामर्थ्य मायमराठीचे । विकसन मायबोलीचे ॥

२००८स्थापना

शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर ही माय मराठीच्या विकासाला वाहिलेली महाराष्ट्रातील एक अग्रगण्य उपक्रमशील संस्था आहे. “सामर्थ्य माय मराठीचे / विकसन मायबोलीचे” या ब्रीदवाक्याने संघाची स्थापना २००८ साली झाली.

मराठी भाषा साहित्य, संस्कृती, संवर्धन, संशोधन आणि सर्जनशील लेखन यासंदर्भात ‘शिविम’ ने विद्यार्थी, शिक्षक व समाजकेन्द्री विविध उपक्रमाने ठसा उमटविला आहे. अकरा राष्ट्रीय चर्चासत्रे, अधिवेशने, युजीसी मान्यताप्राप्त विद्वत्प्रमाणीत ‘शिविम संशोधन पत्रिकेचे’ प्रकाशन, गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव, सामाजिक बांधिलकी असे विविध उपक्रम सातत्याने राबवले आहेत; त्यासाठी अनेक दानशूर हात पुढे येत आहेत.

सभासदांच्या योगदानाने ‘शिविम’ विकासाभिमुख होत आहे. याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.

आमची उद्दिष्टे

  • मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचे संवर्धन करणे.
  • अध्यापन, संशोधन आणि सर्जनशील लेखनाला प्रोत्साहन देणे.
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, अधिवेशने व कार्यशाळांचे आयोजन करणे.
  • बदलत्या अभ्यासक्रमांसाठी (NEP-2020) शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा घेणे.
  • विद्यार्थ्यांसाठी निबंध व कथा लेखन स्पर्धा आयोजित करणे.
  • गुणवंत प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा गौरव आणि सामाजिक बांधिलकी जपणे.
शिविम

संघाची ठळक वैशिष्ट्ये

०१

स्थापना २००८

१ मे २००८ रोजी स्थापन झालेली मराठी प्राध्यापकांची उपक्रमशील संघटना.

०२

राष्ट्रीय चर्चासत्रे व अधिवेशने

आजपर्यंत पंधरा वार्षिक अधिवेशने आणि अनेक राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे.

०३

शिविम संशोधन पत्रिका

ISSN 2319-6025 विद्वत्प्रमाणित, यु.जी.सी. मान्यताप्राप्त त्रैमासिक.

०४

शिक्षक प्रशिक्षण

NEP-2020 नुसार बदललेल्या अभ्यासक्रमांवर कार्यशाळा व प्रशिक्षण शिबिरे.

०५

लेखन स्पर्धा

विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय निबंध व कथा लेखन स्पर्धा.

०६

सामाजिक बांधिलकी

गरजू साहित्यिक व विद्यार्थ्यांना मदत, गुणवंतांचा गौरव.

आमच्याविषयी

कार्यकारिणी

सर्व पहा
भज

डॉ. भरत जाधव

अध्यक्ष
जद

प्रा. जयवंत दळवी

उपाध्यक्ष
मज

प्रा. (डॉ.) मानसी जगदाळे

उपाध्यक्ष
अश

डॉ. अशोक शेलार

उपाध्यक्ष
मह

प्रा. (डॉ.) मंतेश हिरेमठ

सचिव

मायमराठीच्या चळवळीत सहभागी व्हा

चर्चासत्रे, कार्यशाळा, संशोधन पत्रिका आणि स्पर्धांच्या माध्यमातून मराठी भाषा-साहित्याच्या संवर्धनासाठी आमच्यासोबत या.